भर रस्त्यात महिलेने भाजप नेत्याला चप्पल फेकून मारली | Women Thrashed BJP Leader In Uttar Pradesh

2021-09-03 17

ही महिला ज्याला चप्पल फेकून मारतेय तो आहे भाजपचा नेता... महिला या भाजप नेत्याला भर रस्त्यात मारतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय... आता या महिलेवर ही वेळ का आली? या भाजप नेत्याने असं काय केलंय, हे तुम्हाला सांगतो... त्रिवेदीगंज भाजपचे मंडल अध्यक्ष महामार्गावरून दुचाकीनं जात असताना एका महिलेनं त्यांना पकडून चपलेनं मारहाण केली.... पैसे परत देण्याची मागणी करत महिलेनं भाजप नेत्याला शिवीगाळ केल्याचं दिसतंय... भाजप नेत्याला मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव पियारा असं आहे... ती उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील रुकनापूरची रहिवासी आहे... मुलगा मुकेश कुमारला शाळेत नोकरी देतो असं सांगून भाजप नेत्यानं आपल्याकडून १ लाख ७५ हजार रुपये घेतले.... पण मुलाला नोकरी मिळाली नाही.... त्यानंतर पैसे परत मागितले असता भाजप नेत्यानं ४५ हजार रुपयांचा युनियन बँकेचा धनादेश दिला... धनादेश घेऊन बँकेत गेल्यावर त्या खात्यात पैसेच नसल्याचं सांगण्यात आलं, असा आरोप या महिलेने केलाय. (Guruprasad VO)

#lokamt #uttarpradeshnews #uttarpradeshviralnews #viralnewsindia #uttarpradesh #uttarpradeshtrending #uttarpradeshlatestnews #uttarpradeshtodaynews #uttarpradeshwomennews #uttarpradeshnewslive
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp